मराठ्यांना इंग्रजांच्या काळातही आरक्षण होत पण काँग्रेसने ते काढून घेतले होते - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

Foto

औरंगाबाद- औरंगाबाद समीप राष्ट्रीय महामार्गआडगाव बुद्रुक ते चिंचोली या ५.८५ किमी १ कोटी ९५ लक्ष ९७ हजार रुपयाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रमावेळी शनिवारी रोजी ते बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे १० लाख रुपयाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन केले. त्याचबरोबर आडगाव चिंचोली ते परदरी रस्त्याच्या १ कोटी ८१ लाख ४४ हजार रुपयाचे कामाचे भूमिपूजन केले तसेच परदरी येथे १० लाख रूपयाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन केले. चिंचोली येथे १० लाख रुपयाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन केले तसेच चिंचोली तांडा येथे १० लाख रुपयाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन केले. यावेळी बागडे यांनी गावकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मराठ्यांना इंग्रजांच्या काळात आरक्षण होत परंतु १९६५ ला ते काढून टाकल आणि १९६७ ला मराठ्यांना कुनबी मध्ये घेण्यात आलं असाही त्यांनी नवीन शोध लावला.

यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना बागडे म्हणाले कि मराठ्यांना इंग्रजांच्या काळात आरक्षण होत परंतु १९६५ ला ते काढून टाकल आणि १९६७ ला मराठ्यांना कुनबी मध्ये घेण्यात आलं.,.  या काळामध्ये काँग्रेस चेच सरकार होते त्यांनी आरक्षन दिले नाही. मराठा समाजाला तेव्हापासून आरक्षण नव्हतं तर आमच्या सरकारने ते आरक्षण दिल. आरक्षणासाठी ५६ मोर्चे निघाले होते अनेक जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मराठा आरक्षनाची मागणी चालू असताना क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी  घरासमोर घंटानाद आंदोलन केलं होत त्यावेळी मी आरक्षण देण्याच आश्वसन दिल होत आणि ते मी पाळलं असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं.

 पुढे बोलताना बागडे म्हणाले किआम्ही सत्तेत आलो होतो तेव्हा ३५% शौचालय होते. आम्ही हागणदारी मुक्त गाव करण्याचे ठरवलं होत. त्यामुळे आता ९७ % पेक्षा जास्त घरामध्ये शौचालय आहे. मागच्या सरकारच्या काळामध्ये शौचालयला ४ हजार अनुदान मिळायचे आता तेच आम्ही १२ हजार रुपये देतो. गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भाजपा सरकारने १४ व्या वित्त आयोगाची रक्कम थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता ग्रामपंचायत स्वतः गावातील कामे करू शकेल. आणि होणारा काळा बाजार  बंद होईल. पुढे बोलताना ते म्हणालेश्रीमंतांची मक्तेदारी असलेला गॅस आता सामान्य जनतेनी सबसिडी सोडल्यामुळे गरिबातल्या गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत सुद्धा गॅस भाजप सरकारच्या प्रयत्नाने पोहचलेला आहे . १९५५ पासून २०१५ पर्यंत १३ कोटी लोकांकडे गॅस होता मागच्या ४ वर्षात ६ कोटीच्या वर लोकांपर्यंत गॅस पोहचवण्यात सरकार यशस्वी झाले आहे.

या सरकारने मागच्या ४ वर्षात १२ हजार कोटीच्या वर विमा मिळवून दिला आहे. या दुष्काळासाठी सरकारने केंद्र सरकारकडे ८ हजार कोटीची मागणी केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारकडून मदत मिळणार आहे. मागच्या सरकारने कर्जमाफी केली त्यावेळी राज्याच्या वाट्याला फक्त ६.५ कोटी इतके रुपये आले होते तर मराठवाड्याच्या वाट्या फक्त १ हजार कोटी मिळाले होते. या सरकारने २१ हजार कोटीची कर्जमाफी केली असून अजूनही ती चालूच आहे. ज्या बँकांनीकर्जमाफी केली नाही त्यांची चौकशी करू असे प्रतिपादन यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्षांनी केले. 

यावेळी वैधानिक विकास महामंडळ चे अध्यक्ष डॉ भागवत कराडमाजी उपमहापौर राजू शिंदेकृउबास सभापती राधाकिसन पठाडेरामबाबा शेळकेरेखाताई कुलकर्णीभागचंद ठोंबरेशिवाजी डिघोळेदामूआण्णा नवपुतेअनुराधाताई चव्हाणसरपंच नानाबाई दसपुतेदगडू वाघमोडेतालुकाध्यक्ष विकास गायकवाडअशोक पवारगणेश दहिहंडेविनायक हिवाळेबळीराम गावंडेमोतीलाल शिंदेकृष्णा कोरडेनवनाथ वाघमोडेडॉ भगवान नागरेविष्णू दसपूतेताराबाई खटकेविजय नागरेरामकिसन लोखंडेभागचंद ठोंबरेकल्याण गायकवाडअर्जुन नवपुतेसाईनाथ लोखंडेरवी कावडे सुभाष चव्हाण आदी च्या समवेत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.